Thursday, April 9, 2009

जंगल सफारी : वासोटा नागेश्वर

नमस्कार, हा माझा पहिलाच ब्लाँग. आजपर्यंत भरपुर ट्रेक केले. ह्या वेळेस मी आमच्या वासोटा नागेश्वर ट्रेकचा अनुभव लिहितोय.


नेहमीप्रमाणे ह्या आठवड्यात परत e-mail स्पर्धा सुरु झाली, पहिले तापोळा, मग मारलेश्वर आणी शेवटी वासोटा फिक्स झाले. हो नाही करता करता शेवटच्या वेळी ५ जण तयार झालो. बिचारा CD (चेतन दिक्षीत) खूप नाराज झाला. अखेर आम्ही ५ जण मी, लँबडा ( श्रीधर पुरंदरे ) , सीडलेस ( श्रीकांत ), दिग्विजय, चेतन च्या गाडीतून निघालो.


पुणे - सातारा - बामणोली आणी तिथून बोटीने वासोटा असा आमचा प्रवास होता. एक चांगली गोष्ट म्हणजे, सगळ्यांचं वेळेत आवरलं, आम्ही ४ april ला सकाळी ६.३० वाजता निघालो. नाश्टा वैगरे करुन आम्ही १०.४५ पर्यंत बामणोली ला पोहोचलो. CD च्या बडबडीमूळे हा वेळ कसा गेला कळलच नाही, त्यात मधून मधून seedless बोअर मारतच होता.


आम्ही गेलो तेव्हा फार गर्दी नव्हती. forest office ची परवानगी आणी बोटीचं बुकिंग ह्या २ गोष्टी करायच्या होत्या. forest office ला ५५ रुपये प्रत्येकी आणी एक दिवस रहाण्याचे ४०० रुपये extra ग्रुप साठी ( १५ लोकंपर्यंत ). बोटीसाठी डायरेक्ट ग्रुप बुकिंग १४०० रुपये प्रत्येक ग्रुप साठी ( १५ लोकंपर्यंत ).


बोटीने वासोट्याच्या पायथ्याशी जायला २ तास लागतात. आम्ही ५ जणचं असल्याने बोटीचे मालक असल्या सारखे बोटीत लोळत पडलो होतो. कोयना धरणाचा तो प्रचंड पाणीसाठा बघून आम्ही थक्क झालो. मालवणच्या समुद्रात बघितलेल्या त्या dolphin च्या जोडप्याची आठवण आली. पण इथे कुठेही मासे दिसले नाही.











अखेर आम्ही वासोट्याच्या पायथ्याशी पोचलो. forest office तर्फे तिथे रहाण्यासाठी चांगले तंबू व पाण्याची सोय केली आहे. वासोट्यावर किंवा जंगलात रहाण्याची परवानगी नसल्याने खाली तंबूतच रहावे लागते. आमचं सामान तंबूत टाकून आम्ही वासोट्याला निघालो. दुपारी साधारण १ वाजता चढायला सुरुवात केली. दाट जंगलामुळे भरपुर सावली होती. नागेश्वर च्या फाट्यापर्यंत पोहोचायला १ ते १.२५ तास लागतो, तिथून पुढे ३० मिनिटात वासोट्यावर.








वर जाउन पाहिले पोटभर जेवलो. जेवल्यानंतर नागेश्वर पाँईंट बघायला गेलो, तिथे खोटा नागेश्वर आणी नागेश्वर दिसतो. इथे पोहोचल्यावर आपला सगळा शीण निघून जातो. डावीकडे बाबू कडा आणी उजवीकडे नागेश्वर आणी मधे हिरवीगार झाडे असे सुंदर द्रूष्य बघायला मिळते. इथूनच नागेश्वर ला जाण्याचा रस्ता दिसतो.





नागेश्वर पोँईंट

















नागेश्वर पोँईंट













नंतर आम्ही बाबू कड्यावर गेलो , विस्तीर्ण, तितकाच रुद्र आणि तितकाच आकर्षक असा बाबू कडा पाहून हरिशचंद्र गडावरील कोकणा कड्याची आठवण आली.






इथे पाण्याचे कुंड सुद्धा आहे. आम्ही थंड हवा, आणि रम्य निसर्गाचा आनंद घेत होतो, इतक्यात तिथे काळे ढग आले, आणि आम्ही निघणार तेवढ्यात जोरदार गारांचा पाऊस सुरु झाला. एप्रिल महिन्यात गारांचा पाऊस ? माझा २००९ मधला पाहिला पाऊस आणि तो पण गारांचा, मजा आलई. गार हवा अणि धो धो पावसाचा आनंद घेत आम्ही वासोटा उतरलो.





साधारण ७ वाजता तंबूत परतल्यावर , CD ने मस्त milkmade चा चहा पाजला. पोटभर चहा पिउन जे झोपलो ते डायरेक्ट सकाळी उठलो. भुकेचं भानंच राहिलं नाही. रात्री उंदरांच्या चुळबुळी व्यतिरिक्त काहिच त्रास झाला नाही.







सकाळीलवकरंच उठलो, रात्री भरपुर पाऊस पडल्याने नागेश्वर ला जायचं की नाही ते ठरत नव्हतं. हो नाही करता करता आम्ही निघालो. डोंगराळ भागातला पाऊस थोडा विचित्रच, रात्री पावसाने थैमान घातलं आणि सकाळी रस्ता कोरडा, खालची पानं सुकलेली, पण हवेतला गारवा मात्र कायम होता.







नागेश्वर चा रस्ता पुर्ण जंगलातून , पण आम्हाला प्राणी दिसले नाही. एक रानकोंबडा आणि गव्याची पाऊलं तेवढी दिसली. हा रस्ता खुपच छान आहे, एका बाजूला दरी आणि दुसरीकडे जंगल. उन आलं तरी दरीतून येणारी थंड हवा त्याचा त्रास होउ देत नाही. पण रात्री या रस्तयावरुन जाणे टाळावे.










नागेश्वरच्या गुहेत शंकराचं सुंदर मंदीर आहे. जाताना उजव्या बाजुला पाण्याचे कुंड आहे. पाणी उन्हाळ्यात थोडं खराब असतं पण seedless ची chlorine ची बाटली कामास आली. नागेश्वर वरुन आम्ही अपेक्षेपेक्षा लवकर खाली आलो.












खाली आल्यावर बँगा उचलल्या आणि तसेच पाण्यात पोहायला उतरलो. मनसोक्त पोह्यल्यावर बोटीने परतीचा प्रवास सुरु केला. २ तासात साधारण संध्याकाळी ६ वाजता आम्ही बामणोली ला पोहोचलो.



गाडीने परतताना सुद्धा, थंड हवा, धुके अश्या रमणीय वातावरणात आमचा ट्रेक संपला.






5 comments: